ऊसतोड महिलेसाठी डॉक्टर ठरले देवदूत
मांडवगण फराटा, ता. २० : आशासेविकेची तत्परता आणि मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाच्या वेळीच मिळालेल्या उपचारांमुळे ऊसतोड मजूर महिलेची सुखरूप प्रसूती झाली. त्यामुळे या गरीब कुटुंबाला डॉक्टरांच्या रूपात देवदूत भेटल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील जगतापवाडी परिसरात मूळचे जळगाव जिल्ह्यातील एक कुटुंब ऊस तोडणीसाठी वास्तव्यास आहे. या कुटुंबातील लक्ष्मीबाई शिवाजी देवरे (वय २२) या ऊसतोड मजूर महिलेला बुधवारी (ता.१७) पहाटे साडेसहाच्या सुमारास प्रसवकळा सुरू झाल्या. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे कुटुंबीय चिंतेत सापडले. याबाबतची माहिती विकास जगताप यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ आशासेविका जयश्री गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. गायकवाड यांनी मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका पाठविण्यात आली. लक्ष्मीबाई यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वेळीच मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे त्यांची सुखरूप प्रसूती झाली. दोन दिवसांच्या उपचारानंतर आईसह नवजात बाळाला घरी सोडण्यात आले. या कार्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन फटाले, आशासेविका ज्योती बनसोडे, जयश्री गायकवाड, रुग्णवाहिका चालक किरण गायकवाड तसेच विकास जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले. मांडवगण फराटा येथील वैद्यकीय पथकाने वेळेत मदत केल्याने आई व बाळाचे प्राण वाचल्याचे विकास जगताप यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

