पुणे
त्रिंबक हांडे-देशमुख यांचे निधन
मांडवगण फराटा, ता. २३ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील सेवानिवृत्त शिक्षक त्रिंबक नारायण हांडे-देशमुख (वय १०१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बाभुळसर बुद्रुक येथील तत्कालीन लोकल बोर्डाच्या प्राथमिक शाळेत रुजू होणारे ते पहिले शिक्षक होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, दोन बहिणी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी भरतराव व प्रभाकर हांडे-देशमुख हे त्यांचे पुत्र होत. सेवानिवृत्त कृषी अधिकारी बाळासाहेब फराटे हे त्यांचे जावई होत. तर, उद्योजक धनंजय हांडे व मेडिकल व्यावसायिक अमित हांडे हे त्यांचे नातू होत.

