आळंदी-मुंबई एसटी लवकरच होणार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी-मुंबई एसटी लवकरच होणार सुरू
आळंदी-मुंबई एसटी लवकरच होणार सुरू

आळंदी-मुंबई एसटी लवकरच होणार सुरू

sakal_logo
By

आळंदी, ता. १० : मुंबई सेंट्रल ते आळंदी देवाची एसटी सेवा लवकरच सुरू होत आहे. याबाबत माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या काळात ही बससेवा मंजूर केली होती. परंतु पुढे कोणत्याहीप्रकारची हलचाल झाली नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आल्याचे वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर शास्त्री सांगितले.
या बससेवेमुळे ठाणे पालघर, रायगड जिल्ह्याबरोबरच आळंदी देहू परिसरातील वारकरी, नागरिकांची मुंबई ते आळंदी दळणवळणाची सोय होणार आहे. आळंदी शहरात एसटी महामंडळाच्या दोन मध्यवर्ती ठिकाणी जागा रिकाम्या आहेत. मात्र एसटी नाही अशी अवस्था आहे. गावठाणातील जागेचा स्थानिकांनी ताबा घेतला. तर देहूफाटा येथील सुमारे सहा एकर जागेची वापराविना पडून आहे. अनेक खासगी टुरिस्ट ट्रॅव्हल्सच्या गाड्या उभ्या केल्या जातात. डंपर तसेच काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. बहुतांश ठिकाणी कचरा, राडारोडा टाकला जात आहे. मध्यवर्ती ठिकाणी मोठी जागा असूनही एसटी सुरू नसल्याने जागेचा गैरवापर सुरू आहे. दरम्यान अनेक वर्षांपासून आळंदीतून राज्यातील तीर्थक्षेत्र जोडणारी एसटी सेवा सुरू करण्याची मागणी होती. मात्र त्याबाबत कुणी दखलही घेतली नाही. परिणामी या जागेत आता खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या व्यवसाय करत आहेत.

आळंदी-मुंबई बससेवा मुंबई सेंट्रलमधून सुरू होईल. ही एसटी मुंबई सेंट्रल येथून सकाळी सात वाजता निघणार असून आळंदीतून दुपारी चार वाजता पुन्हा निघेल अशी वेळ निर्धारित केली आहे. पनवेलमधूनही एसटी सुरु करण्यासाठी मागणी करणार आहे.
रामेश्वर शास्त्री, अध्यक्ष, वारकरी प्रबोधन महासमिती