धानोरे शाळेत विद्यार्थ्यांनी रेखाटली आकर्षक चित्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धानोरे शाळेत विद्यार्थ्यांनी 
रेखाटली आकर्षक चित्रे
धानोरे शाळेत विद्यार्थ्यांनी रेखाटली आकर्षक चित्रे

धानोरे शाळेत विद्यार्थ्यांनी रेखाटली आकर्षक चित्रे

sakal_logo
By

आळंदी, ता. २३ ः धानोरे औद्योगिक भागातील जिल्हा परिषद शाळेत सकाळ चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे रेखाटली.
पहिली ते दहावी या वर्गासाठीच्या चार गटात झालेल्या स्पर्धेसाठी धानोरे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अ गटातून अठ्ठावन्न, ब गटातून शहान्नव, क गटातून ऐंशी तर ड गटातून बारा विद्यार्थी असे एकूण दोनशे सेहेचाळीस विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते. लहानसे गाव असूनही विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील आविष्कार पांढ-या कागदावर रंगवून वेगवेगळ्या विषयावरील चित्रे रंगविली. यावेळी शाळेच्यावतीने प्राचार्य सत्यवान लोखंडे, तेजराज सारूक, स्वाती गदादे, सुनीता सावंत, मोहंमदी काझी, रशिला पानगे, वैशाली सासवडे, छाया शेवाळे, सुनीता भातकांडे, अलका जाधव, कविता जगताप, मनिषा साबळे, विकास गायकवाड यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

B03080