आळंदी परिसरात चार पिस्तूल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी परिसरात
चार पिस्तूल जप्त
आळंदी परिसरात चार पिस्तूल जप्त

आळंदी परिसरात चार पिस्तूल जप्त

sakal_logo
By

आळंदी, ता. ३० : आळंदी पोलिसांच्या हद्दीत शनिवारी (ता. २८) दरोडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत चार पिस्तूल आणि पाच काडतूस जप्त करत तिघांना अटक केली. रामदास सुरेश सुकळे(सरदार चौक, खेड), तुषार ऊर्फ डेल्या शांताराम टेके (वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव), रियाज हुसेन शेख (पडाळी, ता. खेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख ७७ हजार किमतीचे चार पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली.
तसेच, गुन्हे युनिट चारने दिघी पोलिसांच्या हद्दीत चऱ्होली फाट्याजवळ केलेल्या कारवाईत दोन आरोपींकडून दोन देशी बनावट पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. यामध्ये अक्षय रवी पाखरे (महाळुंगे इंगळे), प्रवीण भारत म्हस्के (रा. पिंपळे सौदागर) यांना अटक केली.