
आळंदीत पारायण प्रतचे प्रकाशन
आळंदीत पारायण प्रतचे प्रकाशन
आळंदी, ता. ६ : आळंदी येथील इंद्रायणी घाटावर सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवात जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने तयार केलेल्या ज्ञानेश्वरीच्या पारायण प्रतचे प्रकाशन शांतीब्रह्म मारोतीमहाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, जोग महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित हरीनाम सप्ताहाची सांगता कन्हैया राजपूत यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. कीर्तन झाल्यानंतर काल्याच्या प्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले. यावेळी बाजीराव चंदीले, डॉ. नारायण जाधव, तुकाराम मुळीक, डी. डी. भोसले यांच्यासह आजी-माजी वारकरी विद्यार्थी आळंदीकर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
-----------------------------------
छायाचित्र ः
आळंदी ः जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने छापलेल्या ज्ञानेश्वरी पारायण प्रतीचे प्रकाशन आज शातीब्रम्ह कुरेकर महाराजांच्या हस्ते करण्यात आले.
पुर्ण....विलास काटे.