Sun, April 2, 2023

संस्कृतीला तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक
संस्कृतीला तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक
Published on : 21 February 2023, 8:47 am
आळंदी, ता. २१ : आळंदीच्या येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील संस्कृती वाघे हिने एकोणीस वर्षाखालील वयोगटांमध्ये राज्यस्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पुढील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी संस्कृतीची निवड झाली.
जळगाव येथे १६ व २७ फेब्रुवारीला ही स्पर्धा संपन्न झाली. संस्कृतीच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे यांनी अभिनंदन केले.
आळंदीतील व्हिक्ट्री तायक्वोंदो ॲकॅडमीतील प्रशिक्षक सुमीत खंडागळे, स्नेहा देसाई, प्रथमेश जाधव, अरिन कर्माकर, रोहन थिटे यांनी संस्कृती वाघे हिला तायक्वोंदोचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.