Thur, March 30, 2023

आळंदी येथे वृक्षारोपण
आळंदी येथे वृक्षारोपण
Published on : 7 March 2023, 1:01 am
आळंदी, ता. ७ : मांगल्य आणि पावित्र्याचे प्रतीक असलेल्या तुळशीच्या रोपांचे रोपण आळंदीतील सिद्धबेट येथे केले. आळंदीतील पत्रकार महादेव पाखरे आणि नगरपालिकेतील कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे १०३ रोपे लावलीत. यावेळी विठ्ठल शिंदे, पितांबर लोहार, अर्जुन मेदनकर, भागवत काटकर, उमेश बिडकर आदी उपस्थित होते.