माउलींच्या रथाला जुंपणाऱ्या बैलजोडीची मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माउलींच्या रथाला जुंपणाऱ्या बैलजोडीची मिरवणूक
माउलींच्या रथाला जुंपणाऱ्या बैलजोडीची मिरवणूक

माउलींच्या रथाला जुंपणाऱ्या बैलजोडीची मिरवणूक

sakal_logo
By

आळंदी, ता. १ : आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीची आज (ता.१) आळंदीकरांनी विठू-माऊलीच्या नामाचा गजर करत फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात मिरवणूक काढली. यंदाच्या वर्षी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील तुळशीराम भोसले यांच्या घराण्याचा आहे.
कर्नाटकमधून विकत आणलेल्या खिलारी बैलजोडीला रोज खुराक, वैद्यकीय तपासणी तसेच शारीरिक मेहनत करून घेतली जाते. सकस आहार दिला जात आहे. दरम्यान, आषाढी वारीतील माउलींचे पालखी प्रस्थान ११ जूनला आहे. तर १२ जूनला पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. या निमित्ताने आज आळंदीकरांनी मानाच्या बैलजोडीची भव्य मिरवणूक काढली. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर, बैलजोडी मालक तुळशीराम भोसले,सागर भोसले, संतोष भोसले,बबनराव कुऱ्हाडे, विलास घुंडरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, मच्छिंद्र शेंडे, रमेश पाटील, जालिंदर जाधव, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, विलास घुंडरे, शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, कुंडलिक कुऱ्हाडे, विठ्ठल घुंडरे, ज्ञानेश्वर गुळूंजकर, विष्णू वाघमारे, सोमनाथ वाघमारे, रोहिदास तापकीर,आनंद मुंगसे, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, उमेश रानवडे, किरण येळवंडे, पांडुरंग भोसले नंदकुमार वडगावकर व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

देवस्थानकडून मानकऱ्यांना नारळ व प्रसाद
बैलांची मिरवणूक भोसले यांच्या वडगांव रस्त्या जवळील घरापासून वाजत गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली. महिलांनी मानाच्या बैलजोडीचे पूजन केले. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी या मानाच्या बैलांचे पूजन करण्यात आले. भैरवनाथ मंदिर, माऊलीं मंदिर तसेच श्री नृसिंह मठ येथे या मानाच्या बैलांचे वेद मंत्र्याच्या उच्चारात विधिवत पूजन करण्यात आले. प्रदक्षिणामार्गे देवूळवाड्यासमोरील महाद्वारात बैलांची मिरवणूक काढली. महाद्वारात बैलजोडी आल्यानंतर देवस्थानकडून मानकऱ्यांना नारळ व प्रसाद देण्यात आणि बैलजोडीच्या मिरवणुकीची सांगता झाली.

03453