हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मेदनकर

हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मेदनकर

आळंदी,ता.३१ : मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण आळंदी (ता. खेड) संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी विवेक बच्चे, महादेव पाखरे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजय इंगुळकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब शिंदे जाहीर केली.
आळंदी (ता. खेड) येथे रविवारी (ता.३०) झालेल्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकारीमध्ये अध्यक्षपदी मेदनकर, उपाध्यक्ष बच्चे आणि पाखरे तर कोषाध्यक्ष सुनील बटवाल, सचिव गौतम पाटोळे, कायेदशीर सल्लगार अॅड. विलास काटे, हरिदास कड, कार्यकारिणी सदस्यपदी भागवत काटकर, अनिल जोगदंड, बद्रीनारायण घुगे, अनिराज मेदनकर, प्रसन्नकुमार देवकर, हनुमंत घोंगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या निमंत्रकपदी अविनाश राळे, जिल्हा प्रतिनिधी हनुमंत देवकर, श्रीकांत बोरावके यांचीही नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. पसायदानाने निवडणूक सभेची सांगता झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com