

आळंदी, ता. २९ : कार्तिक वारीतील माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन, इंद्रायणी स्नान आणि आळंदीतील आध्यात्मिक दर्शनाच्या अनुभूतीची शिदोरी घेऊन राज्यातील भाविक आता परतीच्या मार्गावर आहेत. अनेकजण एसटी तसेच खासगी वाहनाने माघारी परतत आहेत आहेत. परिणामी आळंदी नगरी वारकऱ्यांविना आता शांत वाटू लागली आहे.
शनिवार (ता. २३) ते गुरुवार (ता. २८) आळंदीत कार्तिक वारी सोहळ्यातील मुख्य कार्यक्रमाला वारकऱ्यांनी हजेरी लावून आपल्या घराण्यात पिढ्यान पिढ्या चालत आलेली वारीची परंपरा माउलींचरणी रुजू केली. आठवडाभरात ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन, स्नान असे विविध कार्यक्रम नित्यनेमाने पार करत संतांची आराधना केली. संत दर्शनाने पावन झालेले वारकरी माउलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडल्यानंतर पुन्हा आपापल्या गावी जाण्यासाठी गुरुवार पासूनच निघाले. मिळेल त्या वाहनाने, तसेच काही जण दिंडीतील वाहनाने तर काहीजण एसटीने गावी परतत आहेत.
दरम्यान आळंदी नगरपालिकेपुढे आता शहर स्वच्छतेचे आव्हान आहे. ठिकठिकाणी पडलेला प्लास्टिक कचरा, अन्नपदार्थ, गोळा करण्याचे काम बाकी आहे. तर रस्त्यावर विजेच्या खांबावर लटकलेले जाहिरात फलक काढणे, इंद्रायणी घाट स्वच्छता काम करणे पालिकेसाठी आता आव्हान आहे. तर आळंदीकरांना घराच्या सफाईसाठी बंद नळाद्वारे पाणीपुरवठ्याची लगबग नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची सुरु आहे.
वारकरी भावुक
आळंदीहून पुणे हडपसर पिंपरी चिंचवड भागात जाण्यासाठी पीएमपीची सोय होती. परंतु, पीएमपीने जाणाऱ्या वारकऱ्यांना दीड किलोमीटरची पायपीट करून विश्रामगृहापर्यंत जावे लागले. डोक्यावर सामानाचे ओझे घेऊन वारकरी घरी परतण्यासाठी बससाठी घाई करत होते. यावेळी अनेक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि काहीसे भावनिक भाव दिसून येत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.