कोंडीचा आळंदीकरांना मनस्ताप

कोंडीचा आळंदीकरांना मनस्ताप

Published on

आळंदी, ता. १७: रस्त्यावरील अतिक्रमणे... हातगाड्यांचे भाऊ गर्दी... रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने... दुकानांचे फलक... अशा विविध कारणांनी आळंदी शहरांमध्ये दररोज सायंकाळच्या वेळेला वाहतूक कोंडीचा प्रत्येक येत आहे. मात्र, बुधवारी (ता.१७) सायंकाळी पाचनंतर अडीच तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक कोंडी झाली. यामुळे नागरिक, कामगार, विद्यार्थी वर्गाला कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला.
आळंदी हे पुणे पिंपरी चिंचवड भागातून येणाऱ्या कामगारांसाठी चाकण मरकळ धानोरे शिक्रापूर औद्योगिक भागात जाण्यासाठी मध्यवर्ती केंद्र आहे. शॉर्टकटचा मार्ग म्हणून आळंदीचा वापर केला जातो. अवजड वाहने तसेच कामगारांच्या ने-आण करणाऱ्या वाहनांबरोबरच उबेर ओला सारख्या खासगी व्यावसायिक वाहनांची संख्या आळंदीत वाढली आहे. याचबरोबर आळंदी परिसरात नव्याने झालेल्या टोलेजंग इमारती सोसायटीमुळे आळंदीची दळणवळण वाढ झाली आहे. परिणामी आळंदीत वाहतूक कोंडी सातत्याने होते. यामुळे अनेकांना घरी जाण्यास उशीर झाला.
आळंदी नगरपरिषद अतिक्रमण वारंवार कारवाई करत नसल्याने दुकानदार अतिक्रमण करण्यास धजावले आहेत. दरम्यान, आळंदीत वाहतूक कोंडी जाणवली खास करून वडगाव रस्ता मरकळ रस्ता नगरपालिका चौक देहू फाटा या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती. काळेवाडी येथे देहू फाटा देहू फाटा ते गजानन महाराज मंदिर परिसरातील सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. आळंदीतून बाहेर जाणाऱ्या वाहनांना बाह्यवळण मार्गाची गरज सध्या भासत आहे.
चऱ्होली बाह्य वळण मार्गावर खड्डे पडल्याने तेथे दुरुस्तीची गरज आहे. डुडुळगाव ते केळगाव भागातील जोडणारा पूल अद्याप पूर्ण झालेला नाही. मागील दहा वर्षापेक्षा अधिक काळ काम रखडल्याने पर्यायी मार्ग नसल्याची खंत यावेळी प्रवासी तसेच आळंदीकरांनी व्यक्त केली.


06288

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com