पुंडलिक मंदिरात शिरले इंद्रायणीचे पाणी
आळंदी, ता. २९ : मावळ भागातील वडिवळे आणि आंध्रा धरणातून साडेचार हजार क्यूसेकने पाणी सोडल्याने आळंदीमध्ये इंद्रायणीला पूर आला. इंद्रायणी नदीच्या लगतच्या पुंडलिक मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे.
मागील आठवडाभर सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे मावळ भागातील वडिवळे आणि आंध्रा धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. यामुळे या दोन्ही धरणातून मागील दोन दिवसांपूर्वी वडिवळे धरणातून तेराशे ७६ आणि आंध्राधरणातून २८२० क्यूसेकने पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात आले होते. दरम्यान आज सकाळपासून हा पुरवठा दोन्ही धरणा मिळून साडेचार हजार दिवसाच्या सोडण्यात आलेला आहे. इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणीच्या दोन्ही दगडी घाटावर पाणी पसरले आहे. याचबरोबर इंद्रायणी नदीवरील भक्ती पुंडलिक मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. धरणातून पाणी साठा सोडल्यामुळे गेली काही दिवस प्रदूषणाने काळवंडलेली इंद्रायणी नदी आता काहीशी चकाचक लागले आहे.
मावळ भागातून सोडलेल्या पाण्यामुळे देहू मोई चिंबळी केळगाव आळंदी मरकळ धानोरे भागामध्ये नदीपात्राला पाण्याचा प्रवाहाला वेग आला आहे. त्यामुळे या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
रिल्स आणि व्हिडिओ काढू नका
इंद्रायणी नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी,असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. नदीकाठच्या लोकांनी कपडे धुणे तसेच स्नानासाठी नदीपात्रात उतरू नये. याचबरोबर इंद्रायणी घाटावर सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जण नदीपात्राच्या जवळ जाऊन सेल्फी काढतात. तसेच रिल्स व्हिडिओ काढणाऱ्यांनी कोणत्याही पुलावर तसेच नदीकाठच्या घाटावर उभे राहून रिल्स आणि व्हिडिओ काढू नये.
06372
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.