पुणे
मोटार सायकलची केळगाव येथे चोरी
आळंदी, ता.९ : केळगाव येथील इमारतीच्या वाहन तळामध्ये उभी केलेली स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (एम एच ३७, ए जी १५२४) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी(ता. ५) ते सोमवारी(ता. ६) दरम्यान केळगाव येथील कृष्णाई बिल्डिंगच्या वाहन तळामध्ये घडली. याबाबत फिर्याद विशाल रामदास टोन्चर यांनी दिली आहे. या गाडीची किंमत अंदाजे ५० हजार रुपये होती.