आळंदीत इच्छुकांना नगरसेवकपदाचे ‘डोहाळे’

आळंदीत इच्छुकांना नगरसेवकपदाचे ‘डोहाळे’

Published on

आळंदी, ता. १९ : नगर परिषद निवडणुकीसाठी मतदार यादी छाननी सुरू आहे. अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. मात्र, इच्छुकांना नगरसेवकपदाचे डोहाळे लागले असून शहरामध्ये गल्लीबोळातून इच्छुकांच्या फ्लेक्सची जंत्री दिसून येत आहे. नगर परिषद प्रशासनाने मात्र, शहर विद्रूपिकरणाबाबत बघ्याची भूमिका घेतली आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील प्रत्येक गल्लीबोळात असलेल्या विद्युत खांबावर सार्वजनिक भिंतीवर शाळांवर इच्छुक उमेदवारांच्या जाहिराती बिनदिक्कतपणे झळकत आहेत. देहू फाटा ते इंद्रायणी नदी चाकण चौक गोपाळपुरा सिद्धबेट प्रदक्षिणा रस्ता नगरपालिका चौक दत्त मंदिर मार्ग रस्ता आधी रस्त्यांवर अपेक्षा जाहिरातीत इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने लावल्या आहेत. वास्तविक भोपळापुरामध्ये तर मंगल कार्यालयाच्या जाहिराती फलक रस्त्यावरच मोठ्या आकारात उभे आहेत. मात्र, नगरपरिषदेने कोणतीच कार्यवाही केली नाही. निवडणुकीबाबत अद्याप कोणत्याच पक्षाने जाहीर भूमिका घेतली नाही. अनेक जण पक्षाचे काम करत नाहीत; मात्र पक्षावर प्रभाव पाडण्यासाठी शहरामध्ये करत आहेत. शहर विद्रुपीकरण कायदा नगरपालिकेच्या कामकाजात येतो की नाही, अशी नागरिकांना आता शंका येऊ लागले आहे. सर्वसामान्य नागरिकांना उठल्यानंतर रस्त्यावर आले की पहिले या इच्छुक उमेदवारांचे जाहिरातीचे फ्लेक्स नजरेत येतात. काही मित्र सार्वजनिक स्वच्छतागृहही सोडले नाहीत. यामुळे नगरपालिका जाहिराती कधी काढून शहराचे सौंदर्य अबाधित ठेवणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

प्रभात सातमध्ये सर्वाधिक फ्लेक्स
मागील महिन्यापासून शहरात किती फ्लेक्सधारकांना परवानगी दिली किंवा विद्युत फुलवर खांबांवर अनधिकृत फ्लेक्स किती आहेत याची नेमकी माहिती नगर परिषदेकडून मिळू शकले नाही. सुरुवातीला मुख्याधिकारी खांडेकर यांनी शहरातील विद्युत खांबांवरील फ्लेक्स मुक्त असतात असे जाहीर केले; मात्र केल्या दोन-तीन महिन्यांमध्ये त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. तीन दिवसांपूर्वी प्रभाग १०मध्ये अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली. मात्र, आता त्याच जागेवर पुन्हा दिसून येत आहेत. प्रभाग सातमध्ये सर्वाधिक फ्लेक्सबाजी असल्याचे चित्र आहे.


नगर परिषदेला जाहिरात शुल्क पोटी जानेवारी महिन्यापासून ९ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा उत्पन्न झाले आहे. दरम्यान, नगर परिषद कर्मचारी सध्या प्रारूप मतदार यादीच्या छाननीमध्ये गुंतले असल्याने फ्लेक्सवरती कारवाई करता आली नाही. तीन दिवसांपूर्वी नगर परिषदेने प्रभाग १० मध्ये विद्युत खांबांवरील अनधिकृत फ्लेक्स हटविले.
- महादेव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद

Marathi News Esakal
www.esakal.com