आळंदी नगरी भक्तिरसात न्हाली

आळंदी नगरी भक्तिरसात न्हाली

Published on

आळंदी, ता. ११ : राज्याच्या कानाकोपऱ्यातून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकीवारी सोहळ्यासाठी वारकरी दाखल होत आहेत. काही दिंडाद्वारे तर काही खासगी वाहनांद्वारे आळंदी आपली वारी माऊली चरणी रुजू करत आहे. दरम्यान, वारकऱ्यांचा मुक्काम धर्मशाळा राहुट्यांमध्ये असून नगरपालिका प्रशासन आळंदी देवस्थान वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी सज्ज झाले आहे.
राज्यातून मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण भागातून तसेच मावळ भागातून दिंड्यांचा ओघ सुरू झाला आहे. ज्ञानोबा तुकाराम चा गजर करत वारकरी आळंदी मध्ये आता दाखल होऊ लागले असून ठीक ठिकाणी मुक्कामासाठी सोय करण्याच्या लगबगीत वारकरी आहेत. कोणी धर्मशाळांमध्ये मुक्काम तर कोणी राहुट्यांमध्ये मुक्काम करत आहे. जागोजागी हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहेत. गोपाळपुरा सिद्ध भेट तसेच विश्रांतवाडी अशा ठिकाणी वारकऱ्यांचा मुक्काम विशेष प्रमाणात आहे. आळंदीत आल्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन प्रवचन आणि नगरप्रदक्षिणा इंद्रायणी स्नान नित्यनेम वारकऱ्यांचे आता सुरू झाले आहेत. दिवसभरात आळंदीतील मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसू लागली.
दरम्यान, राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या स्वागतासाठी आळंदी देवस्थान आणि नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे तर पोलिस प्रशासनाचा पोलिसांचा बंदोबस्त रुजू होऊ लागला आहे.वारी काळात वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय साधण्यासाठी नगरपरिषदेमध्ये मध्यवर्ती सुविधा केंद्र तयार केले असून त्या ठिकाणी आठ कर्मचाऱ्यांचे नियुक्ती केले आहेत, असे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले


नगरपरिषदेकडून सोयीसुविधा
८०० फिरती शौचालय
१९ पाण्याचे टँकर
शहर स्वच्छतेसाठी ३५० कर्मचारी
वारी काळात कचरा उचलण्यासाठी १५ घंटागाड्या
विविध सूचना देणारे ५५० सूचनाफलक लावले
१८० सीसीटीव्ही कॅमेरे
घातपात, संशयित हालचाली टिपण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये १२ वॉच टॉवर उभारले असून त्यावर पोलिसांचा वॉच
इंद्रायणीकाठी महिलांना कपडे बदलण्यासाठी चार चेंजिंग रूम
इंद्रायणी नदी पात्रासह नदीकाठी सातत्याने स्वच्छता करण्यासाठी २० कर्मचारी नेमले

केळगाव, चऱ्होली ग्रामपंचायतीही सरसावल्या
आळंदी लगत केळगाव आणि चऱ्होली ग्रामपंचायत हद्दीतही वारकऱ्यांची गर्दी असल्याने त्या ठिकाणी दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ठिकठिकाणी दिवाबत्तीची सोय केली आहे यामध्ये केळगाव ग्रामपंचायतीने सिद्धबेट परिसर, आळंदी-केळगाव रस्ता भागात दिवाबत्ती आणि स्वच्छतेची कामे पूर्ण केली आहेत. चऱ्होली ग्रामपंचायत माध्यमातून वारकऱ्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करणे, पाण्यात शुद्धीकरणासाठी टीसीएल टाकणे, धुरळणी करणे, कचरा उचलणे, कामांची तयारी केली.

06675, 06676, 06677

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com