पुणे
आळंदीत पाणीपुरवठा उद्या राहणार बंद
आळंदी, ता. १६ : भामा आसखेड कुरुळी प्रकल्प येथील विविध दुरुस्तीच्या अनुषंगाने बुधवारी (ता. १७) रात्री साडेअकरा ते गुरुवारी (ता. १८) रात्री दहा वाजेपर्यंत आळंदी नगरपरिषद हद्दीमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भामा आसखेडहून पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीच्या कुरुळी येथील प्रकल्प दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीद्वारे आळंदीला कुरुळी येथून पाणी पुरवठा होत आहे. आता दुरुस्ती पूर्ण झाल्यावर आळंदी शहरास पाणीपुरवठा शुक्रवारी पूर्ववत होईल.

