आळंदीतील विश्रांतवड परिसरात लावला पिंजरा
आळंदी, ता. १७ : शहराच्या सभोवताली नागरी वस्तीजवळ बिबट्याने प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; मात्र मागील आठवड्यापासून बिबट्याचे विविध भागात दर्शन झाल्यावर वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी उसाच्या शेतामध्ये पिंजरा लावण्यात आला आहे.
विश्रांतवड भागात मंगळवारी (ता.१६) दुपारच्यावेळी बिबट्या दिसल्याने नागरिकांची त्रेधा उडाली होती. जवळपास ५०० पेक्षा अधिक घरे या भागात असून रात्रीअपरात्र नागरिक कामाधंद्यावर ये-जा करत असतात. अशावेळी बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी वनविभागाने तत्परता दाखवीत आळंदी ग्रामीणमधील विश्रांतवड भागात एका उसाच्या शेतामध्ये बिबट्याला कैद करण्याकरिता पिंजरा लावला आहे. दरम्यान, रात्रीच्यावेळी नागरिकांना एकटे दुकटे फिरू नये. तसेच लहान मुलांनाही एकट्याने कुठेही सोडू नये. खास करून ज्या ठिकाणी ऊस शेती आहे, त्याच भागात बिबट्याचा वावर आणि निवास असल्याने नागरिकांनी अशा भागात अधिक दक्ष राहण्याची गरज बनली आहे.
मागील काही महिन्यांपासून आळंदी-केळगाव-धानोरे चऱ्होली भागात बिबट्याचा वावर वाढला. मात्र, वनविभागाकडे याच्या संख्येबाबत नक्की आकडेवारी नसल्याचे चित्र आहे. सध्या सोशल मिडियावरून अन्य ठिकाणचेही व्हिडिओ शेअर केले जात असून यामुळे बिबट्याच्या वास्तव्याबाबत गैरसमज आणि अफवा न कळत पसरवले जात असल्याचे चित्र आहे. वास्तविक बिबट्या एकाच ठिकाणी ठाण मांडून बसत नाही. मात्र, तेवढ्या सात-आठ किलोमीटरच्या परिघामध्ये फिरत असल्याने मागील वेळी बिबट्या चऱ्होली खुर्दमधील समर्थनगरमध्ये पाहायला मिळाला. ड्रोनद्वारेही बिबट्याचा माग काढला जात असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
आळंद तीर्थक्षेत्राच्याभोवती नागरिकांचा निवास वाढल्याने बिबट्यापासून संरक्षणार्थ तत्काळ माहिती मिळताच क्षणी उसाच्या शेतामध्ये जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. नागरिकांनी दक्षता घेत बिबट्या दिसताच क्षणी मोठा आवाज करावा. फटाके वाजवावेत.जेणेकरून नागरी भागात जास्तवेळी थांबणार नाही. पहाटेवेळी फिरताना अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. बिबट्या दिसल्यावर छायाचित्र तसेच व्हिडिओ काढताना अतिउत्साह टाळावा.
-अचल गवळी, वनरक्षक
ALD25B06893, ALD25B06894
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

