आळंदी, चऱ्होली खुर्द परिसरात पाच पिंजरे
आळंदी, ता. २३: शहराभोवती फिरणारा बिबट्याने आता थेट शहरात प्रवेश केला आहे. सिद्धबेट, ज्ञानेश्वरी मंदिर आणि केळगाव भागात बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिक सांगत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. दरम्यान वन विभागाकडून सिद्धबेटसह आळंदी आणि चऱ्होली खुर्द भागात एकूण पाच पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी लावले आहेत.
आळंदी चऱ्होली आणि केळगाव भागातच बिबट्याची दहशत मागील दोन आठवड्यापेक्षा अधिक आहे. एकदा शेळीचा फडशा पडल्यानंतर चार दिवसांपूर्वी प्रमोद कुऱ्हाडे यांच्या वडगाव रस्त्यावरील घरामागील कुत्रा बिबट्याने मारला. त्यानंतर बिबट्या विश्रांतवड, नानाश्री मंगल कार्यालय, चाळीस फुटी रस्ता इंद्रायणी नदी किनारी असलेल्या ज्ञानेश्वरी मंदिर परिसर, सिद्धबेट भागात अधिक फिरत असताना नागरिकांना आढळला. आळंदी शहरात बिबट्याचा प्रवेश हा नागरिकांच्या जिवाला आता धोकादायक बनला आहे. बिबट्याच्या बातमीने आता वारकरी विद्यार्थी रात्रीच्या वेळी इंद्रायणी घाटावर पखवाज वाजवायला यायचे कमी झाले. तर आडबाजूला फिरणाऱ्यांची, सकाळी मॉर्निंग वॉक करणारे सध्या बंद झाले. एवढेच काय रात्रीच्या वेळी घरासमोर, धर्म शाळा आवारात फिरणेही बंद झाले आहे. सध्या ऊस तोड सुरू असल्याने अनेकदा त्याच्या मुक्कामाची लपण्याचे ठिकाण बंद होत असल्याने बिबट्या फिरत असल्याचे चित्र आहे.
एआय व्हिडिओने वनविभाग हैराण
अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने बिबट्याचा वावर कुठे आहे कळून येते. मात्र, अनेकदा एआयने बनवलेले खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याचे चित्र आहे. यामुळे वन विभाग हैराण झाला आहे.
आळंदीत बिबट्याबाबतच्या तक्रारी आहेत. सिद्धबेट, हनुमानवाडी हेलिपॅड, विश्रांतवड भागात बिबट्याचा वावर आहे. एकूण किती बिबटे आहेत याबाबत खात्री नाही. मात्र, आळंदी आणि परिसरात पाच पिंजरे लावले आहेत.
- अचल गवळी, वनरक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

