हरिपाठ उद्यानाला हवी आधुनिकतेची जोड

हरिपाठ उद्यानाला हवी आधुनिकतेची जोड
Published on

- विलास काटे, आळंदी
आळंदी, ता. १२ : साधारण पंधरा वर्षांपूर्वी आळंदी नगरपरिषदेने एकमेव उद्यान ६५ लाख रुपये खर्चून तयार केले. मात्र काही महिन्यातच समाजकंटकांनी खेळणी तोडली, तसेच गार्डन जाळून टाकले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी एक कोटी रुपये खर्च करून या उद्यानाची नव्याने निर्मिती केली. त्याला हरिपाठ उद्यान नाव देण्यात आले असून प्रवेशद्वारांना संतांची नावे दिली आहेत.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकमेव उद्यान असल्याने येथे मोठ्या प्रमाणात लहान मुले खेळण्यासाठी येतात. ही जागा अपुरी असल्याने येथे फार सुविधा नाहीत. त्यामुळे शहरात, नगरपरिषद शाळेच्या मैदानामध्ये ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक सारखी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. आरक्षित जागांमध्ये भूसंपादन करून तेथे छोटी उद्याने करणे गरजेचे आहे.

नगरपरिषद क्षेत्रातील बागांची संख्या : १
१) बागांची सद्यःस्थिती व देखभाल
- बागांची दैनंदिन स्वच्छता नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत केली जाते. हरित क्षेत्र टिकवण्यासाठी वृक्षारोपण आणि हिरवळीची निगा राखली जात आहे.
- बसण्याच्या बाकांच्या किरकोळ दुरुस्तीचे काम प्रस्तावित.
- उद्यानांमध्ये विविध शोभिवंत झाडे आणि फुलझाडे लावून सौंदर्यीकरण केले आहे.

२) मुलांसाठी खेळणी
- बागेत घसरगुंडी - २, झोके - १०, सी-सॉ - १ अशी एकूण १३ खेळणी उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुतांश खेळणी सुस्थितीत असून, काही खेळण्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.
- नवीन खेळण्यांची गरज असून आधुनिक खेळण्यांची मागणी होत आहे.

३) उपलब्ध सुविधा
- जॉगिंग ट्रॅक उत्तम स्थितीत आहे.
- नागरिकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय केली आहे.
- महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था असून त्यांची नियमित स्वच्छता राखली जाते.
- रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात पथदिवे कार्यान्वित आहेत.

४) सुरक्षा व गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना
उद्यानांमध्ये तळीराम किंवा गैरप्रकार करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गस्त घातली जाते.
- सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रमुख उद्यानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
- ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष लक्ष दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com