आळंदीतील फसवणूक प्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक

आळंदीतील फसवणूक प्रकरणी 
मुख्य आरोपीला अखेर अटक
Published on

आळंदी, ता. ७ : बनावट सोनेतारण कर्जाद्वारे आळंदी येथील अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेची ११ कोटी ३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला आळंदी पोलिसांनी अटक केली. बाळू अर्जुन पवार (रा. चऱ्होली खुर्द) असे या फरार व्यवस्थापकाचे नाव असून, त्याला बुधवारी (ता. ६) रात्री पुण्यातील टिंगरेनगर भागातून ताब्यात घेण्यात आले.
या पतसंस्थेत अपहार झाल्याबाबतची चर्चा मागील काही महिन्यांपासून पतसंस्थेचे गुंतवणूकदार करत होते. तसेच, आपण जमा केलेले पैसे पतसंस्थेकडे मागण्यासाठी गुंतवणूकदार सतत कार्यालयात ये- जा करत होते. दरम्यान, २४ नोव्हेंबरपूर्वी संचालक मंडळाने पतसंस्थेच्या व्यवस्थापक तथा सचिव म्हणून बाळू अर्जुन पवार यांची निवड करून सर्व कारभाराबाबतचे अधिकार सोपवले होते. त्याचा गैरवापर करून बाळू पवार आणि पतसंस्थेत नेमणूक केलेला ऑडिटर संजय लांडगे, सोनार पूर्णानंद खोल्लम या तिघांनी संगणमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच्या आधारावर बनावट कर्जदार उभे करून त्यांना सोने तारण कर्ज देऊन कर्जाची रक्कम परस्पर स्वतःकडे काढून घेतली. बाळू पवार याने बनावट कागदपत्राच्या आधारे खोटे कर्ज दिल्याचे भासवून ११ कोटी ३ लाख १३ हजार ३८० रुपयांचा अपहार केला. अखेर संचालक मंडळाने आळंदी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी होऊन २३ जानेवारीला पवार, लांडगे आणि खोल्लम या तिघांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये लांडगे आणि खुल्लम यांना जामीन मिळाला, तर पवार याला आळंदी पोलिसांनी पुण्यातील टिंगरे नगर येथून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com