
संघर्ष सोशल फाउंडेशनतर्फे देव प्रशालेत सायकल वाटप
आळेफाटा, ता. १६ ः बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथील गुरूवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेमध्ये संघर्ष सोशल फाउंडेशन जुन्नर तालुका यांच्यावतीने सायकल वाटप कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी सर्वोन्नती मंडळ बोरी खुर्दचे उपाध्यक्ष लक्ष्मण काळे पाटील, उद्योजक अजित काळे, शास्त्रज्ञ डॉ. सचिन पटाडे, प्रशालेचे मुख्याध्यापक महेंद्र गणपुले, संघर्ष फाउंडेशनच्या श्रद्धा लेंडे, प्रणिता वाघमारे, प्रतीक खिलारी, संकेत जाधव, विघ्नेश वाळुंज, सौरव सातपुते हे उपस्थित होते.
फाउंडेशनचे संचालक सुशील जाधव म्हणाले की, फाउंडेशनचे सदस्य वाढदिवसाचा खर्च टाळून, तसेच स्वतःच्या मासिक उत्पन्नातील काही रक्कम बचत करून शाळेतील आर्थिकदृष्ट्या गरीब व हुशार विद्यार्थ्यांना सायकल, दप्तर, गणवेश यांसारख्या उपयोगी वस्तूंचे वाटप करतात. विद्यार्थ्यांनी या मिळणाऱ्या मदतीचा सदुपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. उपक्रमाला प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रा. संजय जाधव यांचे सहकार्य लाभले.
------------