हरिदास ताजवे यांना समाजभूषण पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरिदास ताजवे यांना समाजभूषण पुरस्कार
हरिदास ताजवे यांना समाजभूषण पुरस्कार

हरिदास ताजवे यांना समाजभूषण पुरस्कार

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २२ : येथील (ता. जुन्नर) अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार विश्वकर्मा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिदास ताजवे यांना देण्यात आला. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने दर वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतो.
पुणे येथील गणेश क्रीडा कला मंच या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय वधु वर पालक मेळाव्यात सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी महासंघाचे प्रदेश‌अध्यक्ष हनुमंतराव पांचाळ, कार्याध्यक्ष गणपतराव गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे नगरसेविका प्रतिभा भालेराव, विमल ताजवे, सागर ताजवे, अनुराधा ताजवे आदी मान्यवर उपस्थित होते.
ताजवे हे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचे संस्थापक सदस्य व प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. पुणे जिल्हा सहकार बोर्ड व पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे गेल्या २५ वर्षांपासून काम पाहात आहे. राजगुरू सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाघचौरे यांनी सूत्रसंचालन व मानपत्र वाचन केले.

02368