Sat, March 25, 2023

आळेफाटा येथे २८ हजार कांदा पिशव्यांची आवक
आळेफाटा येथे २८ हजार कांदा पिशव्यांची आवक
Published on : 30 January 2023, 12:52 pm
आळेफाटा, ता.३० : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात रविवारी (ता.२९) कांद्याची २८ हजार ७९२ पिशव्यांची आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास दहा किलोस १४० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
येथील उपबाजारात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस १३० ते १४० रुपये बाजारभाव मिळाला तसेच दोन नंबर सुपर कांद्यास १२० ते १३५ रूपये बाजारभाव मिळला.गोल्टा कांद्यास, ६० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला. गोल्टी कांद्यास दहा किलोस ४० ते ६० रुपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास २० ते ६० रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान, रविवारी बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होऊन सुध्दा बाजारभावात वाढ झालेली नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.