Sun, March 26, 2023

‘लाइफ सेव्हिंग बेड’ प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड
‘लाइफ सेव्हिंग बेड’ प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड
Published on : 14 February 2023, 10:38 am
आळेफाटा, ता. १४ : पुणे जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा अध्यापक संघ, जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर येथे आयोजित केलेल्या ५० व्या जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनात राजुरी (ता. जुन्नर) येथील जाणता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मोठ्या गटातील समर्थ ताजवे, सर्वेश पवार, आयुष पवार या विद्यार्थ्यांनी लाइफ सेव्हिंग बेड हा प्रकल्प सादर केला होता. त्यास तृतीय क्रमांक मिळाला असून या प्रकल्पाची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रकाश जोंधळे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वर गटकळ, बबन हाडवळे, शाकीरभाई चौगुले, प्राचार्य जि. के. औटी, पर्यवेक्षक सुनील पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.