
लघु वितरिकेच्या भूसंपादनाबाबत बेनके यांची शेतकऱ्यांची चर्चा
आळेफाटा, ता.१६ : राजुरी (ता.जुन्नर) येथे पिंपळगाव जोगा डावा कालवा चारी तसेच लघु वितरिका क्रमांक २५ व २६ यासाठी भूसंपादन होत आहे. त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार अतुल बेनके यांची राजुरी शेतकऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या बैठकी पार पडली. यात जमिनीची फेरमोजी व भूसंपादनचा मोबदला मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी राजुरीचे ग्रामस्थ व पिंपळगाव जोगा पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी समवेत बैठक घेतली व भूसंपादनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत वरिष्ठांना संपर्क करून योग्य त्या सूचना अधिकारी वर्गाला बेनके यांनी दिल्या. त्याचप्रमाणे शेतीसाठी पाणी वितरण आणि आवर्तने याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली.
यावेळी राजुरी येथील जयसिंग औटी, चंद्रकांत जाधव, धीरज औटी, राहुल रायकर, सुदाम औटी, गोविंद वाघ, नाचर, सुदाम औटी, सुरेश औटी, बाबूराव औटी, बाळाजी औटी, सरोदे, हाडवळे व इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
02506