ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळावर स्वाभिमान पॅनेलची सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळावर स्वाभिमान पॅनेलची सत्ता
ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळावर स्वाभिमान पॅनेलची सत्ता

ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळावर स्वाभिमान पॅनेलची सत्ता

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २७ : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या निवडणुकीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज स्वाभिमान पॅनेलने सतरापैकी १५ जागांवर विजय मिळविला. तर संत ज्ञानेश्वर माउली पॅनेलला दोन जागांवरच समाधान मानावे लागले.
ज्ञानेश्वर ग्रामोन्नती शिक्षण मंडळाच्या संचालकपदाच्या १७ जागांसाठी झालेल्या मतदानात २७२५ सभासदांपैकी २६०६ जणांनी मतदान केले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके, माऊली कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष धनंजय काळे, आळेगावचे सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज स्वाभिमान पॅनेलने १७ पैकी १५ जणांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. यामध्ये जिवन रामदास शिंदे, सौरभ नेताजी डोके, देविदास महेंद्र पाडेकर, किशोर बापूराव कुऱ्हाडे, बबन रावजी सहाणे, अर्जुन सखाराम पाडेकर, दिनेश महीपत सहाणे, बाबूराव कान्हू कुऱ्हाडे, रमेश गोविंद कुऱ्हाडे, अजय केरभाऊ कुऱ्हाडे, सम्राट संजय कुऱ्हाडे, प्रदीप कुमार गुंजाळ, शिवाजी गेणभाऊ गुंजाळ, अरुण पोपट हुलवळे, कैलास गेणभाऊ शेळके हे उमेदवार; तर ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मावळते अध्यक्ष संत ज्ञानेश्वर माउली पॅनेलमधून भाऊदादा लक्ष्मण कुऱ्हाडे व उल्हास गेणभाऊ सहाणे हे २ उमेदवार निवडून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रागिणी खडके यांनी काम पाहिले.