हरीनाम सप्ताहात व्याख्यानमाला अभिनव उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरीनाम सप्ताहात व्याख्यानमाला अभिनव उपक्रम
हरीनाम सप्ताहात व्याख्यानमाला अभिनव उपक्रम

हरीनाम सप्ताहात व्याख्यानमाला अभिनव उपक्रम

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २८ : ‘‘सध्या तरुण पिढी सोशल मीडिया आणि मोबाईल यांच्या अतिरेकी वापरामुळे सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांपासून वेगाने दूर जात असून, विद्यार्थ्यांमध्ये संयमाचा अभाव, चिडचिड तसेच नैराश्य यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले असून, आळे येथील श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट व ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाने अखंड हरीनाम सप्ताहात व्याख्यानमालेचे आयोजन करून तरुणाईच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच त्यांच्यात नैतिक मूल्यांची जोपासना करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य सुरु केले आहे,’’ असे मत जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र आळे (ता. जुन्नर) येथील श्री क्षेत्र रेडासमाधी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सात दिवसांच्या व्याख्यानमालेचा समारोप तहसीलदार सबनिस यांच्या उपस्थितीत झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे, प्रसन्न डोके, अखंड हरिनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष संतोष पाडेकर, व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे, अरुण गुंजाळ, नेताजी डोके, भाऊदादा कुऱ्हाडे, अर्जुन पाडेकर, प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव, संजय कुऱ्हाडे, देविदास पाडेकर, अभिजित शिंदे, अमित शिंदे, प्रदीप गुंजाळ, संतोष सहाणे व सुभाष पाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या ठिकाणी झालेल्या सात दिवसांत प्रा. डॉ. नागेश गवळी यांचे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय, नीलेश जगताप यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, प्रा. नीलेश परबत यांचे मी कोण आहे?, कवी रामदास घुंगटकर यांचे पसायदान, प्रा. गिरीश डागा यांचे मेरे पास मा है व प्रा. उमेश बागडे यांचे सखा माझा ज्ञानेश्वर या विषयांवर व्याख्याने झाली.
प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संजय वाकचौरे यांनी आभार मानले.