Tue, March 28, 2023

राजुरी, उंडखडक येथे
सोमवारपासून यात्रोत्सव
राजुरी, उंडखडक येथे सोमवारपासून यात्रोत्सव
Published on : 28 February 2023, 11:18 am
आळेफाटा, ता. २८ : जुन्नर तालुक्यातील राजुरी, उंचखडक येथील श्री भैरवनाथ यात्रोत्सवाच्या निमित्ताने ६ व ७ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये पहिल्या दिवशी महापूजा, मांडव डहाळे, काठी पालखी होणार आहे. तसेच, पहिल्या दिवशी रात्री नऊ वाजता ‘बारा गावच्या बारा अप्सरा’ हा ऑर्केस्ट्रा व दुसऱ्या दिवशी मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. तसेच दोन दिवस बैलगाड्यांच्या स्पर्धा होणार आहेत. बैलगाडा स्पर्धेचे टोकन २ मार्च रोजी भैरवनाथ मंदिरात होणार आहे, अशी माहिती भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय हाडवळे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कणसे, सयाजी हाडवळे व बी. टी. डुंबरे यांनी दिली