आळे येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळे येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
आळे येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

आळे येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ५ : आळे (ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय छात्रसेना २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, महाराणी येसूबाई, महाराणी सईबाई, महाराणी तारामती, झांसी की राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महिला शिक्षणवादी फातिमा शेख, पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, भारतरत्न इंदिरा गांधी, महान खेळाडू पी. सिंधू, सानिया मिर्झा, वकील, डॉक्टर, महाराष्ट्र महिला पोलिस, सिने अभिनेत्री अशा विविध वेशभूषा परिधान करून प्रभात फेरी काढून समाजातील महिलांप्रती आदर, सन्मान, समानतेची वागणूक यासाठी या विद्यार्थिनींनी घोषणा देत जनजागृती केली.

यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव, प्रा. संजय वाकचौरे, कॅ. डॉ. सुषमा कदम, प्रा. नूतन जोशी, प्रा. शेख, प्रा. गागरे, प्रा. जाधव, प्रा.भटेवरा यांनी प्रयत्न केले.