नळावणे येथे दांपत्यास चोरट्यांकडून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नळावणे येथे दांपत्यास 
चोरट्यांकडून मारहाण
नळावणे येथे दांपत्यास चोरट्यांकडून मारहाण

नळावणे येथे दांपत्यास चोरट्यांकडून मारहाण

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ८ : नळावणे (ता. जुन्नर) येथे चोरट्यांनी मंगळवारी (ता. ७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारासदांपत्यास मारहाण करून दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व चार हजार रुपयांची रोख रक्कम लुटली.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी माहिती दिली की, नळावणे येथील दत्तात्रेय साबळे व त्यांच्या पत्नी वैशाली साबळे हे मंगळवारी रात्री जेवण करून झोपले असता रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून साबळे यांना लोखंडी पाईपने मारहाण करत खिशात असलेले चार हजार रुपये काढून घेतले. तसेच, त्यांच्या पत्नी वैशाली यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातील कुड्या, पाळ्या पायात असलेले चांदीच्या पट्ट्या काढून घेतल्या. तसेच, चोरट्यांनी हे करत असताना या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर मारहाण करत त्यांच्या अंगावर बिछाना टाकला व ‘या ठिकाणाहून उठला तर जिवे मारुन टाकू,’ असा दम देत पळून गेले. या दोघांवर नारायणगाव या ठिकाणी उपचार चालु आहेत. घटनास्थळी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलिस उपनिरीक्षक सुनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी भेट दिली. पुढील तपास पुढील तपास अनिल पवार हे करत आहेत.