
खेडकर यांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा
आळेफाटा, ता.९ : राजुरी उंचखडक (ता.जुन्नर) श्री भैरवनाथ यात्रौत्सवानिमित्त बैलगाडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या बैलगाडा स्पर्धेत पहिल्या दिवशी घाटाचा राजा गणपत खेडकर यांचा गाडा ठरला तर दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा समर्थ दाते यांचा गाडा घाटाचा राजा ठरला. शर्यतीत ४०० हून अधिक बैलगाडे धावले.
शर्यतीत गाडा नंबर एकसाठी एक लाख रुपये, गाडा नंबर दोन साठी ७५ हजार रुपये तर गाडा नंबर तीनसाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. फळीफोड गाड्यास दोन्हीही दिवसांसाठी प्रथम क्रमाकांस १३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार, तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये देण्यात आले तसेच १२ सेकंदात ३५ गाडे, १३ सेकंदात १०५ गाडे, १४ सेकंदात ६४ गाडे, १५ सेकंदात ४७ बैलगाडे धावले.
अंतिम स्पर्धेत राकेश मुरलीधर खैरे व जगनदादा गीताराम कोऱ्हाळे यांचा बैलगाड्याचा क्रमांक आला. तर दोन्ही दिवसांसाठी प्रथम क्रमांकास २ मोटार सायकल, द्वितीय क्रमांकास २ इलेक्ट्रॉनिक बाईक, तृतीय क्रमांकास एल.इ.डी टिव्ही व घाटाचा राजासाठी दोन्हीही दिवसांसाठी ११,१११ रुपये व २० फुटी कांडे जोडून प्रथम क्रमांकात येणाऱ्या गाड्या २० हजार सातशे सात रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
यात्रौत्सवासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पांडुरंग पवार, आशा बुचके, स्नेहल शेळके, शरद चौधरी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उंचखडक गावच्या सरपंच सुवर्णा कणसे, माऊली शेळके, मोनिका वाळुंज, वल्लभ शेळके, अजय कणसे, एम.डी.घंगाळे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय साबळे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कणसे, बी. टी. डुंबरे, सयाजी हाडवळे, संस्थांचे पदाधिकारी तसेच गाडा शौकीन उपस्थित होते.
02593