Sat, March 25, 2023

आळेफाटा बसस्थानकाची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
आळेफाटा बसस्थानकाची विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
Published on : 19 March 2023, 8:46 am
आळेफाटा, ता.१८ : येथील बोटा माळवाडी गावातील स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथील बसस्थानकात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पोखरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. याठिकाणी आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात आळे गावचे सरपंच प्रीतम काळे, आळेफाटा पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, वडगाव आनंद ग्रामपंचायतीच्या सदस्या वैशाली देवकर, आगार प्रमुख ठोबळे आदी उपस्थित होते.