
गोविंद औटी यांची कालवड ठरली मेळाव्यची राणी
आळेफाटा, ता. १४ : राजुरी (ता.जुन्नर) येथे कमलामाता देवीच्या उत्सवानिमित्त संकरित वासरांचा मेळावा व वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी गोविंद औटी यांची कालवड मेळाव्याची राणी ठरली. तिला २५०१ रुपयांचे बक्षीस व एक ५० किलोची हिपर बॅग देण्यात आली
मेळाव्यात शून्य ते सहा महिने वयोगटात निखिल हाडवळे यांच्या वासराच्या प्रथम क्रमांक आला तर द्वितीय क्रमांक सुरेश गायकर व गंगाराम हाडवळे यांच्या वासरांचा नंबर आला. तृतीय क्रमांक प्रफुल्ल हाडवळे यांच्या वासराचा आला. त्यांना अनुक्रमे १ हजार, ७५१, ५०१ रुपयांचे बक्षीस व प्रथम क्रमांकास एक २५ किलोची काफस्टार्टर बॅग देण्यात आली.
यावेळी माजी सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, गणेश सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे, गोविंद औटी, एकनाथ शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी औटी, रंगनाथ पाटील औटी, सखाराम गाडेकर, किरण औटी, गोरक्ष हाडवळे, तुकाराम डुंबरे, निवृत्ती औटी, साईनाथ हाडवळे, ज्ञानेश्वर हाडवळे, रवी गाडगे, गणेश दूध संस्थेचे सचिव निवृत्ती हाडवळे, मोहन हाडवळे, डॉ. श्रीरंग बढे, डॉ. विनायक पानसरे, डॉ.योगेश औटी, विक्रम डुंबरे, अजय पवार, उत्तम दुरगुडे, अक्षय काळे आदी उपस्थित होते.
प्रशांत हाडवळे यांची कालवडी प्रथम
सहा ते बारा महिने वयोगटात प्रशांत हाडवळे यांच्या कालवडीचा प्रथम क्रमांक आला तर द्वितीय क्रमांक समीर औटी यांच्या कालवडीचा आला व तृतीय क्रमांक गणेश हाडवळे यांच्या कालवडीचा आला. त्यांना अनुक्रमे १५०१, १००१, ७५१ रुपयांचे बक्षीस व प्रथम क्रमांकास एक २५ किलोची काफस्टार्टर बॅग देण्यात आले.
बारा महिन्यांपेक्षा जास्त वयोगटात राहुल बाळासाहेब हाडवळे यांच्या गाईचा प्रथम क्रमांक आला तर द्वितीय क्रमांक दावला हाडवळे यांच्या गाईने पटकविला व तृतीय क्रमांक प्रतीक दांगट यांच्या गाईस मिळाला. त्यांना २००१, १५०१, १००१ रुपयांचे बक्षीस व प्रथम क्रमांकास एक ५० किलोची ग्रोवर बॅग देण्यात आली.
बाळासाहेब हाडवळे यांनी प्रास्ताविक तर सखाराम हाडवळे व नीलेश हाडवळे सूत्रसंचालन यांनी केले व आभार मंडळाचे अध्यक्ष बाळू औटी यांनी मानले.
राजुरी येथे पशुधनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -२ वरून श्रेणी-१ सारखा उन्नत दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- डॉ.प्रशांत धर्माधिकारी, सहायक आयुक्त, शिरूर विभाग
02733