Sun, Sept 24, 2023

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वैशाली देवकर यांना प्रदान
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वैशाली देवकर यांना प्रदान
Published on : 6 June 2023, 10:39 am
आळेफाटा, ता. ६ : वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने वैशाली देवकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सामाजिक क्षेत्रात योगदान केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्कार वितरणप्रसंगी डी.बी. वाळुंज, कल्पवृक्ष अध्यक्ष महिला बचत गटाच्या संगीता काशी केदार, अंजली देवकर, पुष्पा देवघर, शैला देवकर, नर्गिस पठाण, सुगंध देवकर ग्रामसेवक तुकाराम खैरे, राहुल वाळुंज, श्याम वाळुंज, निमेश वाळूंज, गोपी शिंदे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
02942