आळेफाटा परिसरात प्लॅस्टिक कचऱ्यात वाढ

आळेफाटा परिसरात प्लॅस्टिक कचऱ्यात वाढ

Published on

आळेफाटा, ता‌. ६ : पुणे‌-नाशिक महामार्गावरील संतवाडी फाट्यावरील रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिक पिशव्यांसह घनकचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बहुतांश वाहनचालकांना तसेच स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.

दरम्यान आळेफाटा हे पुणे-नाशिक व नगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथे बाजार पेठेची वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिक वाढले आहेत. त्याचबरोबर रहदारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय उपलब्ध नसल्याने रात्रीच्यावेळी अज्ञातांकडून महामार्गाच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे. तर बाजूला असलेल्या ओढ्यात मटण-चिकन व्यावसायिक रोजची घाण टाकत आहे. अतिशय कुबट, सडलेल्या पदार्थाचा वास त्या भागातून जाणाऱ्या प्रवाशांनाही त्रासदायक ठरतो. तेथे राहणाऱ्यांसाठी तर तो कायमचा मनस्ताप ठरत आहे. वाढत्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढल्याने संबंधित ग्रामपंचायतींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

तरी रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर १० दिवसांमध्ये कडक कारवाई करावी अन्यथा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा संतवाडी येथील काळजी झाड फाउंडेशनच्यावतीने केला असून, यासंबंधित निवेदन ग्रामपंचायत आळे व वडगाव आनंद, पंचायत समिती जुन्नर, तालुक्याचे आमदार, शिरूर लोकसभेचे खासदार, पुणे जिल्हा आरोग्य विभाग यांना दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.