आळेफाटा येथील उपबाजारात १४ हजार कांदा पिशव्यांची आवक

आळेफाटा येथील उपबाजारात १४ हजार कांदा पिशव्यांची आवक

आळेफाटा, ता.३१ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात रविवारी (ता. ३०) १४ हजार ९९ कांदा पिशवीची आवक झाली. दहा किलोला २०१ रुपये बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.
आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढ्याच्या बाजारात एक नंबरच्या सुपर गोळा कांद्यास दहा किलोस १८० ते २०२ रुपये बाजारभाव मिळाला तसेच एक नंबर कांद्यास १६५ ते १८० बाजारभाव मिळाला‌. दोन नंबर कांद्यास १४० ते १६५ रुपये बाजारभाव मिळला तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस ७० ते १२५ रुपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास दहा किलोस ३० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला व बदला कांद्यास दहा किलोस ६० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
सध्या मार्केटमध्ये कांद्याची घटल्याने या आठवड्यात झालेल्या मोढ्यांच्या बाजारात कांद्याच्या बाजारभाव दहा किलोला १५ ते ३० रुपयां भाव वाढ झालेली आहे, अशी माहिती कांदा व्यापारी सचिन डावखर, सचिन जाधव, चैतन्य कुऱ्हाडे, शिरीष पटेल, सुनील कुऱ्हाडे, रंगनाथ घोडेकर, युवराज खोत, संदीप कोरडे, संतोष गांधी, रामदास शिंदे, तान्हाजी कुऱ्हाडे, संतोष कुऱ्हाडे, अनिल गडगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, शिवप्रसाद गोळवा यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com