वडगाव आनंद येथे 
बसविले रोहित्र

वडगाव आनंद येथे बसविले रोहित्र

आळेफाटा, ता. ६ : वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील पांढरमळ्यात असलेली रोहित्रामध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून वारंवार बिघाड होत होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात यावी बाबतची मागणी येथील ग्रामस्थांनी आमदार अतुल बेनके यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार बेनके यांच्या विशेष सहकार्यातून वडगाव आनंद गावठाण येथील पांढरमळा या ठिकाणी नवीन रोहित्र बसविली आहे. या कामाचा पाठपुरावा सरपंच रेलिका जाधव, उपसरपंच ऋषिकेश गडगे, ग्रामपंचायत सदस्य गणेश भुजबळ, वंदना शिंदे, अर्चना काशिकेदार, सामाजिक कार्यकर्ते डी.बी. वाळूंज यांनी केला. तसेच भारती वायरमन, नितीन चौगुले, विलास शिंदे, योगेश गडगे, गोपाळ वाळूंज, विलास वाळूंज, पांडुरंग शिंदे, नितीन शिंदे भीमाजी शिंदे, महेंद्र शिंदे यांनी मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com