आळे येथे शिबिरात १२८ जणांची नेत्रतपासणी

आळे येथे शिबिरात १२८ जणांची नेत्रतपासणी

आळेफाटा, ता. २५ : डिसेंट फाउंडेशन, पुणे, सुवर्णयुग युवामंच, आळेफाटा यांच्या सहकार्याने व शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या माध्यमातून आळे (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. त्याचे उद्‍घाटन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, पंचायत समितीचे माजी उपसभापती गंगाराम गुंजाळ, पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे, शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके, सचिव शिवाजी कुऱ्हाडे, सहसचिव नामदेव दिघे, माजी सैनिक जालिंदर माळी, नागेश कुऱ्हाडे, हिरोजी कुऱ्हाडे, भाऊ डावखर, गणेश शिंदे, योगेश वाघचौरे आदी उपस्थित होते.
यावेळी १२८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि ३० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. या शिबिरामार्फत रुग्णांना शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, नाश्ता आणि एक महिन्याची औषधे आदी सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आळे व वडगाव आनंद येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com