संतोष सातपुते यांची शाळांना मदत

संतोष सातपुते यांची शाळांना मदत

Published on

आळेफाटा, ता. ७ : शिरोली तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ व मुंबईकर हे न्यू इंग्लिश स्कूल, जि. प. प्राथमिक शाळा, शिरोली बोरी व परिसरातील अंगणवाड्या यांच्या शैक्षणिक व भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. असे प्रतिपादन राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी शिरोली येथे केले.

मुंबई येथील उद्योजक संतोष सातपुते यांनी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना १५० टिफिन बॅग व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ६४ बूट जोड्या व प्रत्येकी दोन सॉक्स जोड्या दिल्या. तसेच, दोन्ही शाळांना मिळून १८० माध्यान्ह भोजनासाठी डिश व परिसरातील अंगणवाड्यांना पाटी व पेन्सिल असे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्याचप्रमाणे दत्तात्रेय सातपुते यांनी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये किमतीच्या ८० कंपास पेट्या भेट दिल्या.

याप्रसंगी उपसरपंच दत्तात्रेय डावखर, उद्योजक भास्कर खिल्लारी, सामाजिक कार्यकर्ते अजित खिलारी, मंगेश खिलारी, नवनाथ खिलारी, सुरेश खिलारी, गणेश खिलारी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती डावखर, सुभाष खिलारी, राजू पोळ दोन्ही शाळांचे शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. जी. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन एकनाथ तट्टू यांनी केले. आभार सुनंदा ढगे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.