बाजारभाव वाढलेल्याने चोरट्यांचा टोमॅटोवर डल्ला

बाजारभाव वाढलेल्याने चोरट्यांचा टोमॅटोवर डल्ला

Published on

आळेफाटा, ता.८ : शिंदेवाडी (ता.जुन्नर) येथे बबन कोंडिबा शिंदे या शेतकऱ्याचे २० क्रेट टोमॅटो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी (ता.८) रात्रीच्या सुमारास घडली.
सध्या टोमॅटो चांगला बाजारभाव मिळत असल्याने पिकाची राखण करण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात शिंदे यांनी तक्रार दिली असल्याचे सांगितले

शिंदेवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी राहत असलेले शिंदे यांच्या शेतातील तोडणीस आलेली २० क्रेट अंदाजे ४०० ते ४२० किलो टोमॅटो अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री तोडून नेली आहेत. शिंदे सोमवारी सकाळी शेतात फेरफटका मारण्यास गेल्यानंतर त्यांना चोरट्यांनी रात्री टोमॅटो तोडून नेल्याचे निर्दशनास आले. यामध्ये शिंदे यांचे तीस ते बत्तीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

04896

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com