शेतीला दिलेल्या जोडधंद्यामुळे दुग्ध व्यवसायात ‘प्रगती’
आळेफाटा, ता.१५ : आळे (ता.जुन्नर) येथील प्रगती आरोटे यांनी २०१८ मध्ये घेतलेल्या एका गाईच्या जोरावर ४२ गायांच्या आधुनिक मुक्त गोठा साकारला आहे. उच्चप्रतीच्या एचएफ व जर्सी वंशावळीच्या गायांचे संगोपन करून एका महिन्यात खर्च वजा जाता आरोटे कुटुंबाला ५५ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. शेतीला दिलेल्या जोडधंद्यामुळे आरोटे कुटुंबाचे दूध व्यवसायात आर्थिक ‘प्रगती’ साधली आहे.
प्रगती आरोटे यांच्या गोठ्यातून दररोजचे २८० लिटर दूध विक्रीसाठी जाते. त्यातून मिळालेल्या पैशातून गाईंचा औषधोपचार, मजूर, मुरघास व पशुखाद्याचा खर्च वजा जातो. दररोजचे दुधाचे १२०० ते १५०० मिळतात. त्यातून महिन्याला ४५ हजार रुपये तर तसेच महिन्याला तीन ट्रॉली शेण खतही निघते. त्यातून १० हजार रुपयांची कमाई होते. असे ५५ हजार रुपयांचा नफा मिळतो.
बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या प्रगती आरोटे यांनी पती शरद यांच्या मदतीने शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायात सुरू केला. आरोटे त्यांच्याकडे आता २७ गाया, १५ कालवडी लहान वासरे अशी एकूण ४२ जनावरे आहेत. ५० ते ६० गाया करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी गायांच्या मुक्त संचारासाठी ८० बाय ४५ सावली साठी शेड व ८० बाय ५० तार कंपाउंड मोकळेपणाने फिरण्यासाठी आधुनिक गोठा उभा केला आहे.
दरम्यान, प्रगती आरोटे यांनी कमी कालावधीत चांगल्या प्रकारे दूध व्यवसायात भरारी घेतल्याने त्याच्या आधुनिक गोठ्याला भेट देण्यासाठी परिसरातील शेतकरी भेटी देतात. त्यांना हा व्यवसायात पती शरद, मुलगा कैवल्य, सासूबाई अनुसया यांची मोलाची साथ आहे.
असे दिले जाते पशुखाद्य
१. शेतात मका शुगर ग्रेज व सुपर नेपियर चारा पिके
२. एका गाईस १० किलो, नेपियर, गवत १२ किलो, गव्हाचे भुसा २ किलो
३. सुग्रास म्हणून शेंगदाणा पेंड १ किलो, मका पावडर २ किलो.
४. कांडी ४ किलो हे खाद्य दोन वेळा विभागून दररोज वापरले जाते.
५. वर्षभर पुरेल एवढा १०० टन मुरघास तयार
थंडाव्यासाठी फॉगर सिस्टीम
गोठ्यात तयार झालेल्या कालवडी पैकी एक कालवड व्याली असून २० ते २२ लिटर तिने दूध दिले आहे. गायांना शुद्ध व ताज्या पाण्याची व्यवस्था केली आहे. डॉक्टरांच्या
सल्ल्याने वेळोवेळी लसीकरण व जंत निर्मूलन केले जाते. गोठ्या उन्हाळ्यात गायांना थंडावा राहावा यासाठी फॉगर सिस्टीम बसवली आहे.
06517
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.