संत सावता परिषदेकडून 
काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

संत सावता परिषदेकडून काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

Published on

आळेफाटा, ता. ५ ः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०व्या) जन्मोत्सवानिमित्त श्री संत सावता साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून इच्छुकांना ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज’ या विषयावरील स्वरचित काव्यरचना सादर करायच्या आहेत. या काव्यरचना २० ऑगस्ट पर्यंत विशाल गडगे (९७६३७१२३०१), संदिप वाघोले (९८६०७७७४२२) यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी केले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १ हजार रुपये आणि उत्तेजनार्थ म्हणून तीन जणांस ५०१ रुपये असे पारितोषिक आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com