पुणे
राजुरीत आद्य क्रांतिवीर नाईक यांना अभिवादन
आळेफाटा, ता. ९ : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राजुरी (ता. जुन्नर) येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
राजुरी ग्रामपंचायतीच्या वतीने राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच माऊली शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाकीर चौगुले, सखाराम गाडेकर, जी. के. औटी, नितीन औटी, आकाश चव्हाण, संतोष चव्हाण, नाना चव्हाण, नितीन चव्हाण, गणेश गफले, संतोष गफले, नितीन माकरे, बाळासाहेब माकरे, शरद मोरे, गणपत माकरे, विशाल जेडगुले, गंगाराम औटी आदी मान्यवर उपस्थित होते.