काव्यलेखन स्पर्धेत प्रदीप देशमुख अव्वल
आळेफाटा, ता. २३ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सवानिमित्ताने श्री संत सावता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक प्रदीप देशमुख (चंद्रपूर), द्वितीय क्रांती राणे पाटील (सातारा), तृतीय डॉ. संजय गायकवाड (छत्रपती संभाजीनगर) तर साहेबराव घुले (अहिल्यानगर), अपर्णा कुळकर्णी (नागपूर), सीताराम नरके (पुणे) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत महाराष्ट्रासह परदेशातूनदेखील नवोदित कवींपासून ते अनुभवी साहित्यिकांपर्यंत सर्व वयोगटातील ४५० कवींनी सहभाग नोंदवला.
प्राप्त रचनांमध्ये भक्तिप्रधान ओव्या, गझल, मुक्तछंद, अभंग, द्विपदी अशा काव्यप्रकारांचे वैविध्य पहावयास मिळाले. मौलिकता, विषयसुसंगती, आशय संपन्नता, प्रबोधनभाव या निकषांवर आधारित रचनांचे परीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
साहित्य परिषदेचे अध्यक्ष विशाल गडगे यांनी सांगितले की, ‘‘संतांचे चरित्र, विचार, कार्य काव्याद्वारे समाजापर्यंत पोहोचवणे, नवी पिढी संस्कारक्षम करणे, सृजनशीलतेकडे वळविणे तसेच राज्यभरातील साहित्यिक व साहित्यप्रेमींना एकत्र आणणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.’’ प्राप्त काव्यरचनांचे परीक्षण ज्येष्ठ कवी व समीक्षक प्रा. विजय लोंढे व स्पर्धेचे समन्वयक कविवर्य संदीप वाघोले यांनी केले, तर स्पर्धा यशस्वितेसाठी युवक संघाच्या महिलाध्यक्षा अनुराधा गडगे, जुन्नर तालुका अध्यक्ष संजय लक्ष्मण शिंदे यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.