गोमाता पतसंस्थेतर्फे ११ टक्के लाभांश
आळेफाटा, ता. २४ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील गोमाता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने यावर्षी सभासदांना ११ टक्के लाभांशासह दीपावली भेटवस्तू देण्यात येणार आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश गडगे यांनी दिली.
गोमाता पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा गडगे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभेसाठी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राहुल खोकले, मानद सचिव रवींद्र गडगे, कोंडिभाऊ वामन, अशोक गडगे, गजानन गडगे, भानुदास गडगे, दत्तात्रेय गडगे, नितीन चौगुले, श्रीमती शांताबाई गडगे, संगीता शिंदे, आशा आल्हाट, अर्जुन अमुप, शिवाजी गडगे, संस्थेच्या राज्यभरातील सर्व शाखांचे व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेमध्ये गडगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह राज्यभरात दोन शाखा कार्यरत आहेत असे सांगून अध्यक्ष गडगे म्हणाले की, पतसंस्थेमध्ये २२८७ सभासद आहेत. अधिकृत भागभांडवल पाच कोटी रुपये असून वसूल भागभांडवल एक कोटी ९२ लाख रुपये इतके आहे. पतसंस्थेला अहवाल वर्षात २९ लाख ९१ हजार रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेला लेखा परीक्षणाचा सतत अ वर्ग प्राप्त होत असून पतसंस्था सर्व सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दोन लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविणार असल्याचे अध्यक्ष गडगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन प्र .मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश शिंदे यांनी केले. सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने व एकमुखाने पाठिंबा देवून मंजूर केले. अशोक गडगे यांनी आभार मानले.
07065
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.