आळेफाटा येथे मिरवणुकीने  
दुर्गामातेचे मूर्तींचे विसर्जन

आळेफाटा येथे मिरवणुकीने दुर्गामातेचे मूर्तींचे विसर्जन

Published on

आळेफाटा, ता. ३ : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील राजुरी, आळे,‌ आळेफाटा, बोरी बुद्रूक, साळवाडी, जाधववाडी, वडगाव आनंद, उंचखडक, कोळवाडी, संतवाडी, लवणवाडी या गावांतील सर्वच नवरात्रोत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन केले.
राजुरी येथील दुर्गा माता नवरात्र मंडळ, पंचरंगी भावकी मंडळाच्या अंबिका माता नवरात्रोत्सव मंडळाने दुपारी लवकरच विसर्जन मिरवणुक काढल्या होत्या. सर्वच मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करत व दांडिया खेळत मिरवणुका काढल्या. मिरवणुकीमध्ये गुलाल न वापरता फुले वापरून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम राबविला. सर्वच ठिकाणच्या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राजुरी गावातील सर्वच मूर्तींची उंचखडक येथील भैरवनाथ पाझर तलावात विसर्जन केले. तर आळेफाटा येथील मूर्तींचे विसर्जन पिंपळवंडी येथील कुकडी नदीत केले.

Marathi News Esakal
www.esakal.com