माझा एकच ध्यास, 
करीन गटाचा विकास

माझा एकच ध्यास, करीन गटाचा विकास

Published on

माझा एकच ध्यास,
करीन गटाचा विकास

जुन्नर तालुक्यातील राजुरी- बेल्हे जिल्हा परिषद गटामध्ये स्नेहल शेळके यांना कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसतानादेखील गेल्या पंचवार्षिकमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेचे सदस्यपदी काम करत गटातील प्रत्येक घरातील विशेष करून महिलांच्या निगडित असलेल्या आरोग्यविषय सर्व समस्या सोडविण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी वेळोवेळी त्यांनी वेळोवेळी गरजू लोकांना केलेल्या मदतीमुळे, तसेच त्यांची सामान्य पार्श्वभूमी संघर्ष क्षमता सार्वजनिक राजकारणातील अनुभव आणि स्थानिक लोकांशी संवाद करण्याच्या वृत्तीमुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली आहे.

स्नेहल शेळके यांचा परिचय
स्नेहल शेळके या जुन्नर तालुक्यातील राजुरी- बेल्हे जिल्हा परिषद गटातील राजुरी गावच्या असून, त्यांचे शिक्षण MCA, MBA पर्यंत झालेले असून, त्यांनी सन २०१२ ते २०१६ पर्यंत या गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे. सामाजिक व राजकीय काम पाहत असताना त्यांना त्यांचे पती वल्लभ वसंतराव शेळके, दिर विवेक वसंतराव शेळके, सासरे वसंतराव शेळके व राजुरी गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माउली शेळके यांची मोलाची साथ मिळत आहे.

सामाजिक व राजकीय कार्य
सामान्य जनतेच्या गरजेनुरूप त्यांच्या इच्छा, अपेक्षांची पूर्तता करणारी धोरणे अवलंबताना त्याचा केलेला सखोल अभ्यास व त्याला अनुसरून प्रत्येक जिल्हा परिषद सभेमध्ये प्रत्येक कामाचा सातत्याने केलेला पाठपुरावा आणि तळागाळातील जनमानसाचा पाठिंबा म्हणून या गटात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक विकासकामे करू शकले, असे मत स्नेहल शेळके यांनी व्यक्त केले. राजुरी- बेल्हे गटातील मंजूर करून घेतलेल्या विकासकामांच्या भूमिपूजन व उद्‍घाटनांमुळे आता लोकांना खऱ्या अर्थाने विकास काय आहे, हे कळायला लागले आहे. जलसंधारणातून केलेली कामे असतील, नाला खोलीकरण, रस्ते मजबुतीकरण, सिमेंट बंधारे, मुस्लिम दफन भूमी, स्मशानभूमी, सभामंडप, संरक्षण भिंत, पाझर तलाव दुरुस्ती, मंदिर परिसर सुशोभीकरण, भूमिगत गटारे, दलित वस्ती सुधारणा, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, प्रतिभा संपन्न आरोग्य योजना, अशा अनेक विविध जनहितार्थ योजना प्रभावीपणे राबवून विकास हाच माझा ध्यास आणि ध्येय असल्याचे स्नेहलताईंनी सिद्ध करून दाखवले आहे. तसेच, जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेले पिंपळगाव जोगे डावा कालवा व चिल्हेवाडी बंद पाइपलाइनचे पाणी भागावर नेण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार. विशेष करून
जिल्हा परिषद सदस्य असताना पठारी भागावरील गावांमध्ये अनेक जलसंधारणाची कामे केल्यामुळे भर उन्हाळ्यात देखील विहिरीला चांगल्या प्रमाणात पाणी असते. त्यांच्या कार्यकाळात शेळके यांनी प्राथमिक शाळा व्यवस्थित केल्या ठिकठिकाणी सभामंडपाची कामे केली आहेत. पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून अनेक ठिकाणी तरुणांना व्यायाम शाळा साहित्य तसेच भजनी मंडळाला भजनांचे साहित्य वितरित करण्यात आले .

योजना व प्राधान्यक्रम
‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत १०५ कुटुंबातील तरुणांना जातीचे दाखले काढून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ज्यामुळे या तरुणांना उच्च शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत अनेक लोकांना मोफत जातीचे दाखले, वैयक्तिक लाभाच्या योजना, तसेच प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करून देण्यास महसूल विभागाच्या वतीने व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करून सक्रिय सहभाग नोंदवला. तरुण व युवकांना जास्तीत जास्त उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करून उच्च शिक्षणानंतर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मिळावे घेतले. त्याचप्रमाणे भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणांच्या संधी उपलब्ध करून देणार व लघु उद्योगांसाठी लागणारे साहित्य जिल्हा परिषद व पंचायत
समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देणार आहे. काळाची क्रांती पावले ओळखून डिजिटल क्रांती घडविण्यासाठी तरुणांना एकत्रित करून रोजगार मिळेल डिजिटल लिटरसी या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करणार आहे.

महिला सक्षमीकरण
स्नेहल शेळके यांनी महिला सक्षमीकरण, सबलीकरण, तसेच महिला आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी शासनामार्फत राबवलेल्या जाणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जागर स्त्री शक्तीच्या या कार्यक्रमांतर्गत समाज प्रबोधनाचे काम केले. महिलांमध्ये हिमोलग्लोबिनचे प्रमाण लक्षात घेऊन हिमोग्लोबिन तपासणीची अनेक शिबिरे, त्यावर उपाययोजना म्हणून मोफत रक्तवाढीच्या गोळ्यांचे वाटप केल्या. तळागाळातील महिलेपर्यंत जाऊन गावोगावी आणि घराघरांत शासनाच्या स्तुत्य उपक्रमांचे प्रचार आणि प्रसार करण्याचे काम त्यांनी केले. आरोग्यविषयक जनजागृती करून शौचालयाचे महत्त्व पटवून देत असताना जास्तीत जास्त शौचालये निर्मिती, बांधणी आणि त्याचा जाणीवपूर्वक वापर करण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम निर्मल ग्राम योजनेच्या माध्यमातून केले. पुणे जिल्हा परिषद व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत महाकाय आरोग्य शिबिर यशस्वीपणे राबविले. त्याचा हजारो रुग्णांना लाभ झाला. शेकडो रुग्णांच्या मोफत शस्रक्रियादेखील करण्यात आल्या. या गटामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्याकारणाने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व गावातील सर्व संस्थांच्या सहकार्याने ‘शिवनेरी कृषी महोत्सव’ या नावाने भव्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले. त्याचा लाभ असंख्य शेतकरी, गवळी बांधवांना झाला.

नागरिकांसाठी संदेश
ग्रामीण भागातील असलेल्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून, आपण मला पुन्हा एकदा पुणे जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी द्यावी, दिलेल्या संधीचे सोनं नक्की करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com