राजुरीत हायड्रोपोनिक शेतीचा अनोखा प्रयोग
आळेफाटा, ता. ६ : शेती सध्या परंपरागत व्यवसाय नाही, तर अत्याधुनिक उद्योगव्यवस्था बनली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि संसाधनांचा योग्य वापर केल्यास कमी जागेतही मोठे उत्पन्न मिळवता येते. या संकल्पनेतून राजुरी (ता.जुन्नर) येथील दोन तरुण उद्योजक मयूर शेटे आणि अमर पडवळ यांनी एक वर्षापूर्वी हायड्रोपोनिक शेतीचा (मातीशिवाय पाण्यातील पोषक तत्वांचा वापर करून केलेली जलशेती) जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी करून दाखविला. तो प्रगतशील शेतकरी करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
राजुरी येथील मयूर शेटे व अमर पडवळ यांनी आपल्या शेतामध्ये एक हजार ५०० चौरस फूट जागेत शेतीफार्म तयार केले आहे. यात आठ फूट उंचीचे पीव्हीसी पाइप्स वापरले. प्रत्येक पाइपामध्ये साधारण ६० रोपे लावले आहेत. अशा प्रकारे २३५ पाइप्स बसविले आहेत. यामध्ये पचनक्रियेसाठी हलकी असलेली आरोग्यदारी लेट्यूस ही भाजीचे उत्पादन घेतले आहे. ही भाजी प्रामुख्याने चीनमध्ये उत्पादित केली जाते. त्याच बरोबर धना, मेथी, पालकेचेही उत्पादन घेतले आहे.
हायड्रोपोनिक पद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मातीची आवश्यकता नसून त्यामुळे जमिनीची गुणवत्ता, शेतीयोग्यता किंवा भूजलपातळी या अडचणींचा प्रश्नच उद्भवत नाही. पद्धतीत पाण्याचा वापर पारंपरिक शेतीपेक्षा ८० ते ९० टक्के कमी होतो. पाणी टाकल्यावर ते पुन्हा पुनर्वापरासाठी सर्क्युलेशन सिस्टीममधून परत येते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही आणि उत्पादन टिकवून ठेवता येते. हायड्रोपोनिकमध्ये पोषक द्रावणाचे प्रमाण अचूकपणे नियंत्रित केले जाते.
वनस्पतींना मिळतात हे घटक
- नायट्रोजन
- फॉस्फरस
- पोटॅशियम
- कॅल्शियम
-मॅग्नेशियम
फार्ममध्ये लेट्यूस, पुदीना, कोथिंबीर, पालक, स्ट्रॉबेरी, बेसिल अशा विविध पिकांची लागवड केली जाते. या पिकांना बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. विशेषतः हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट आणि ऑर्गेनिक प्रोड्यूस शॉप्समध्ये हायड्रोपोनिक पद्धतीत पिकांची वाढ जलद असल्यामुळे वर्षभरात अनेक पिकांचे फेर चक्र घेता येते. हे सर्व काम ऑटोमेशन सिस्टीमद्वारे केले जाते.
- अमर पडवळ
पहिल्या काही महिन्यांतच हायड्रोपोनिक पद्धतीचे अनेक फायदे लक्षात आले. कमी जागा, कमी पाणी आणि मातीविना शेती असूनही उत्पादनाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड झाली नाही. पुणे जिल्ह्यात एक आदर्श मॉडेल बनले आहे.
- मयूर शेटे
07285
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

