वडगाव आनंदच्या यात्रोत्सवात धावले ६२४ बैलगाडे

वडगाव आनंदच्या यात्रोत्सवात धावले ६२४ बैलगाडे

Published on

आळेफाटा, ता. १७ : वडगाव येथे पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत सतीश गुंजाळ आणि गारुडी बाबा बैलसंघटनेचा गाडा घाटाचा राजा ठरला.
वडगाव आनंद, मोरदरा, पादीरवाडी (ता. जुन्नर) येथील कळमजाई मातेच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय बैलगाड्यांच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पुणे, ठाणे, अहिल्यानगर, नाशिक तसेच सातारा जिल्ह्यातून ६२४ बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ९० बैलगाडे धावले. दोन नंबर मध्ये २०० तर तिन नंबरमध्ये १०७ बैलगाडे धावले. फायनलमध्ये ७५ बैलगाडे धावले. तसेच फळीफोड नवनाथ हुलवळे, निखिल गायकवाड शिवशंभो बैलगाडा संघटना यांच्या बैलगाड्याने केली.
फायनल किशोर दांगट, भिकाजी मुळे, नवनाथ हुलवळे, स्वयम निमसे, गजानन पवार यांच्या बैलगाड्याने गाजविली.
चार दिवस चाललेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस १ लाख १ हजार १११ रुपये, द्वितीयसाठी ७५ हजार ७७७ रुपये, तृतीयसाठी ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच नं १ फळीफोड गाड्यासाठी ११ हजार १११ रुपये, द्वितीय फळीफोडसाठी ७ हजार ७७७ रूपये, तृतीय फळीफोडसाठी ५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच फायनलसाठी दोन दुचाकी, एक सोन्याची अंगठी, फ्रीज, पिठाची चक्की, टिव्ही, जुपता गाडा, सायकल, पंखा, कुलर, फिल्टर, गिझर, मिक्सर आदी बक्षिसे देण्यात आली. यात्रेचे नियोजन कळमजाईमाता देवस्थान ट्रस्ट, वडगाव आनंद, मोरदरा, पादीरवाडी ग्रामस्थांनी केले होते, अशी माहिती जालिंदर गागरे, शांताराम गागरे, गोट्या गोफणे, बाबू मोरे, मंगेश पादिर, संपत पादिर, विजय मोरे, सुरेश चौगुले आदींनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com